Home Breaking News नागपूर जबलपूर महामार्गावर दुचाकीचा अपघात, तरुण ठार.

नागपूर जबलपूर महामार्गावर दुचाकीचा अपघात, तरुण ठार.

255
0

नागपूर/पारशिवनी (Nagpur/Parseoni) – नागपूर जबलपूर महामार्गावर पारशिवनी तालुक्‍यातील कन्हान पोलिस ठाण्यांतर्गत वाघोली शिवारात रविवार दि.23 एप्रिलला दुपारी 2 वाजता झालेल्या अपघातात मनसर येथील 23 वर्षीय तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मनसर येथील प्रभाग क्रमांक 5 मध्ये राहणारा सौरभ रोशन बिरनवार हा मित्रांना भेटण्यासाठी ड्रॅगन पॅलेस कामठी येथे गेला होता, कामठीहून मनसरकडे परत येत असताना सौरभ बिरनवार यांची बजाज केटीएम – आर.सी 200 क्रमांकाच्या दुचाकीचे राष्ट्रीय महामार्ग क्र. 44 वरील वाघोली शिवारात तोल गेल्याने सौरभ बिरनवार हे मोटरसायकलसह सुमारे 100 मीटरपर्यंत फरफटत गेले, यामध्ये सौरभ बिरनवार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच कन्हान पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शव विच्छेदनासाठी कामठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. कन्हान पोलिसांनी घटनेची नोंद करून तपास सुरू केला असून, हा रस्ता अपघात होता, की मोटारसायकलस्वाराला अज्ञात वाहनाने धडक तर दिली नाही ना! याचा तपास कन्हान पोलीस करीत आहे.

बातमी संकलन:पंकज चौधरी

Previous articleमोपेडची रोडरोलर ला धडक, महिलेचा मृत्यू तर पतीची प्रकृती चिंताजनक
Next articleहिंगणा परिसरातील अग्रो प्रॉडक्ट कारखान्याला आग, आगीत कामगारांचा जळून मृत्यू झाल्याची माहिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here