Home Breaking News वन विभागाची कारवाई, राजकीय नेत्यांचे नातेवाईक असल्याने थातुर मातुर कार्यवाही झाल्याची बाब

वन विभागाची कारवाई, राजकीय नेत्यांचे नातेवाईक असल्याने थातुर मातुर कार्यवाही झाल्याची बाब

संग्रहित छायाचित्र

111
0

नागपूर/रामटेक (Nagpur/Ramtek): दि.२१एप्रिल रोजी गुप्त माहिती आधारे वनविभागाच्या टीमने बोथिया पालोरा गावात सकाळी अंदाजे ९वाजताचे सुमारास आरोपी नामे ,चंद्रभान मरकोल्हे याचा घरी धाड घातली त्यात लाखो रुपये किंमतीचे सागवान फर्निचर आढळून आले.परंतू वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी फक्त १४ हजार चारशे अंशी रुपयाचा मुद्देमाल जप्त करून दिखाव्यासाठी थातूर मातुर कारवाई केली.

. सदर आरोपी हा अनेक दिवसापासून वन विभागाची नजर चुकवून अवैधपणे आपल्या घरी जंगलातील सागवान चोरून आणून त्यापासून विविध प्रकारचे फर्निचर साहित्य तयार करून अधिक किंमतीत विक्री करायचा.कारवाई दरम्यान वनविभागाला अनेक प्रकारचे सागवानी साहित्य आढळून आले.परंतु वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी राजकीय दबावाखाली येऊन खाना पूर्ती करीता नाम मात्र कारवाई केल्याचे बोलले जात आहे.आरोपी चंद्रभान मरसकोल्हे हा जिल्हा परिषद सदस्य यांच्या नातेवाईक असल्याचे संगितले जाते.तसेच आरोपी गावात असतांनाही अद्याप अटक झाली नाही.त्यामुळे वन विभागाच्या कारवाईवर प्रश्न चिन्ह उपस्थित होतो.
सदर आरोपी हा वन हक्क समितीचा सदस्य हि होता.बोथिया पालोरा वन हक्क समितीला
शासनाकडून चराई व गायरन करीता २५० एकर वन जमीन देण्यात आली असून त्या वन जमिनीवरून जातिवंत वृक्षतोडून त्यापासून फर्निचर बनवून बाहेर मोठया किमतीत विक्री करतात असे गावातील लोकांनी सांगितले.सदर आरोपी विरुद्ध वन विभागाने अपराध क्र.०४८४६/१२११३१ अन्वये जप्तीची कारवाई केली.हि कारवाई वन परीक्षेत्र अधिकारी डी बी वाघ यांचे मार्गदर्शनाखाली ए एम अवस्थी क्षेत्र सहायक पवनी ,वनरक्षक यु व्ही सोडगीर,व्ही बी शिंदे,पी एस माटे,वनमजूर डी एस सोनगेंदे यांनी केली.
. सदर कारवाई बफरचे वनपरिक्षेत्र अधिकारी तायडे यांनी केली होती.परंतू कारवाईचे स्थळ हे प्रादेशिक वनपरिक्षेत्रात येत असल्याने सदर कारवाई प्रादेशिकचे वनपरीक्षेत्र अधिकारी वाघ यांना सोपविण्यात आल्याचे सांगितले जाते.

SOURCEसंग्रहित छायाचित्र
Previous articleपारशिवनी येथे दिव्यांग लाभार्थ्यांना”राष्ट्रीय वयोश्री योजना व एडीप योजनेअंतर्गत”सहाय्यक साधने व उपकरणाचे वितरण
Next articleखापावासी म्हणतात… निवडणुका केव्हा होणार… समस्या मांडायच्या कुणाकडे?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here