Home Breaking News पारशिवनी येथे दिव्यांग लाभार्थ्यांना”राष्ट्रीय वयोश्री योजना व एडीप योजनेअंतर्गत”सहाय्यक साधने व उपकरणाचे...

पारशिवनी येथे दिव्यांग लाभार्थ्यांना”राष्ट्रीय वयोश्री योजना व एडीप योजनेअंतर्गत”सहाय्यक साधने व उपकरणाचे वितरण

74
0

नागपूर/पारशिवनी (Nagpur/Parseoni):- दि.२४ एप्रिल २०२३-   जिल्हा समाज कल्याण विभाग, जिल्हा आरोग्य विभाग, अलीम्को, कानपूर आणि समेकीत क्षेञीय कौशल विकास, पुनवर्सन आणि दिव्यांगजन सशक्तीकरण केंद्र, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२३ एप्रिल २०२३ ला खडतकर सभागृह, पारशिवनी  येथे ३७५ दिव्यांगजन आणि राष्ट्रीय वयोश्री अंतर्गत जेष्ठ नागरिकांना कृञिम साहित्याचे वितरण आमदार आशिष जयस्वाल यांनी केले.

यावेळी जि.प.अध्यक्षा मुक्ताताई कोकोडे,उपाध्यक्ष कुंदा राऊत,जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.दीपक सेलोकर,दिव्यांगजन सशक्तीकरण केंद्र चे संचालक प्रफुल शिंदे,अधिक्षक समाज कल्याण विभाग प्रविण मुंडे, पं.स.रामटेक सभापती मंगला निंबोने,जि.प.सदस्य अर्चना भोयर, जि.प.सदस्य व्यंकट कारामोरे, गटविकास अधिकारी जाधव,पारशिनी तालुका आरोग्य अधिकारी प्रशांत वाघ,शिवसेना उपजिल्हा प्रमुख वर्धराज पिल्ले उपस्थित होते.

दिव्यांग व्यक्तींचे जीवन सुखकर करण्यासाठी मी सर्वोतपरी प्रयत्न करणार असे आ.आशिष जयस्वाल यावेळी म्हणाले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा समाज कल्याण विभाग,जिल्हा आरोग्य विभाग,पुनर्वसन आणि दिव्यांगजन सशक्तीकरण केंद्र नागपूर, पंचायत समिती पारशिवनी, दिव्यांग च्या विशेष शाळा,रामटेक, गौरव पनवेलकर, दिपक शिवरकर, राजेश गोमकाडे, राहुल ढगे, आशिष पिंपळामुळे, आशिष धोटे यांनी सहकार्य केले.

बातमी संकलन: विवेक पाटील 

Previous articleहिंगणा परिसरातील अग्रो प्रॉडक्ट कारखान्याला आग, आगीत कामगारांचा जळून मृत्यू झाल्याची माहिती
Next articleवन विभागाची कारवाई, राजकीय नेत्यांचे नातेवाईक असल्याने थातुर मातुर कार्यवाही झाल्याची बाब

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here