Home Breaking News मोपेडची रोडरोलर ला धडक, महिलेचा मृत्यू तर पतीची प्रकृती चिंताजनक

मोपेडची रोडरोलर ला धडक, महिलेचा मृत्यू तर पतीची प्रकृती चिंताजनक

120
0

रामटेक/ देवलपार(RAMTEK/Deolapar) – देवलापार पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील पवनी येथे देवलापार कडून भरदाव येणाऱ्या मोपेडची धडक उभ्या रोडरोलरला दिल्याने झालेल्या अपघातात   महिलेचा मृत्यू झाल्याची घटना दि.२३ एप्रिलला ५ वाजताच्या सुमारास घडली.

प्राप्त माहितीनुसार, देवलापार कडून नागपूरकडे येत असताना अचानक मोपेड क्रमांक एम,एच,४९ बी,६८२३यावरून चालकाचे नियंत्रण सुटल्याने महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या रोडरोलरला जोरदार धडक दिली.यात दोन्ही नागपूर येथील रहिवासी पत्नी सौम्याप्रवीण मोहम्मद जावेद वय ३२ वर्ष. व पती मोहम्मद जावेद वय ४० वर्ष. हे अपघातात गंभीर जखमी झाले.

घटनेची माहिती ओरिएंटल टोल प्लाझा खुमारी यांना मिळताच पी.आर.ओ. गजेंद्र लोखंडे,अंबुलन्स टीम डॉ.हनवत,प्रवीण ठाकूर पेट्रोलिंग टीम कुंजीलाल तुमडाम,दीपक भिमटे यांनी घटनास्थळ गाठले.व तात्काळ जखमींना नागपूर येथे उपचारासाठी घेऊन गेले.नागपूर येथे घेऊन जात असताना वाटेतच पत्नीचा मृत्यू झाला.पतीचीही प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.जखमी पतीवर मेडिकल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.

बातमी संकलन: पंकज चौधरी 

Previous articleवाघाची दहशत थांबता थांबेना, पुन्हा वाघाने केली गाईची व वासराची शिकार
Next articleनागपूर जबलपूर महामार्गावर दुचाकीचा अपघात, तरुण ठार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here