Home Breaking News वाघाची दहशत थांबता थांबेना, पुन्हा वाघाने केली गाईची व वासराची शिकार

वाघाची दहशत थांबता थांबेना, पुन्हा वाघाने केली गाईची व वासराची शिकार

104
0

रामटेक (RAMTEK) – गेल्या अनेक दिवसांपासून रामटेक तालुक्यात वाघ व बिबट्याचा हैदोस सुरू असल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसात अनेक जनावरासहित दोन व्यक्तींचा वाघाने बळी घेतला आहे. दि.२२ एप्रिलला मध्यरात्रीत सुमारे १ ते २ वाजताच्या सुमारास पवनी वनपरिक्षेत्र हद्दीत येणाऱ्या भिल्लेवाडा येथील रहिवासी ओमप्रकाश डोले यांच्या शेतातील गोठ्यात बांधलेल्या जनावरांपैकी एका गाईला व वासराला वाघाने ठार केल्याची घटना घडली आहे.

सकाळी पशुपालक आपल्या शेतावर गेले असता त्यांना गोठ्यातील गाय व वासराची शिकार झाल्याचे समजले.घटनास्थळावरून काही अंतरावर वाघाच्या पायाचे पंजे आढळून आले आहेत.घटनेची माहिती तात्काळ वनपरिक्षेत्र अधिकारी डी.बी.वाघ यांना देण्यात आली.वनविभागाचे कर्मचारी बी.बी.बांगरे,वनरक्षक पी.एस.गजाम,वनकर्मचारी ए. डी. माथरे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. नुकसानग्रस्त पशुपालकाला वनविभागाने नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्याची मागणी आहे.तसेच वनविभागाने रात्रीच्या वेळी या परिसरात पेट्रोलिंग करावी अशी भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Previous articleकोदेगांव -तिघई मार्गाचे हाल बेहाल, बांधकाम प्रशासन निद्रावस्थेत, त्वरीत दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी…
Next articleमोपेडची रोडरोलर ला धडक, महिलेचा मृत्यू तर पतीची प्रकृती चिंताजनक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here