Home Breaking News कोदेगांव -तिघई मार्गाचे हाल बेहाल, बांधकाम प्रशासन निद्रावस्थेत, त्वरीत दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी…

कोदेगांव -तिघई मार्गाचे हाल बेहाल, बांधकाम प्रशासन निद्रावस्थेत, त्वरीत दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी…

99
0

सावनेर/खापा (Savner/Khapa)-22/04/2023: सावनेर तालुक्यातील कोदेगाव – तिघई मार्गाला जागोजागी खड्डे पडले असून काही ठिकाणी गिट्टी उखडल्याने रोडची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे वाहन चालकास त्रास सहन करावा लागतो. गिट्टि उखडल्यामुळे गाडी स्लीप होऊन अपघाताची शक्यता बळावली आहे. बांधकाम विभागाने याकडे त्वरित लक्ष देऊन या मार्गाची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी तिघई येथील सरपंच रमेश बाविसकर तसेच ग्रामस्थांनी केली आहे.

कोदेगांव-तिघई व -तिघई ते खापा फाट्यापर्यंतच्या हा तीन किलोमीटर अंतराच्या रोडला जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहे. रोडचे डांबर उखडल्याने गिट्टी रोडवर पसरली आहे.वाहन चालकाला या रस्त्यावरून सावधगिरी बाळगूनच वाहन चालवावे लागते. बांधकाम विभागाचे मात्र याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.

तालुक्याच्या ठिकाणी सावनेरला तसेच खापा येथे जाने येण्याच्या हाच तिघई ग्रामस्थांच्या मुख्य मार्ग आहे.रोडवर जागोजागी खड्डे व उखडलेल्या गिट्टी मुळे रोडची दुर्दशा झाली आहे. खड्डे व उखडलेल्या गिट्टीमुळे गाडी घसरून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.बांधकाम विभागाने रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी. अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

प्रतिक्रिया :- “कोदेगांव -तिघई व तिघई खापा फाट्यापर्यंतच्या रस्त्याला खड्डे व गिट्टी उखडल्याने हा रस्ता खराब झाला.अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. बांधकाम विभागाने या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी.”  रमेश बाविसकर, सरपंच ग्रा.पं.तिघई

बातमी संकलन:किशोर गनविर

Previous articleअखेर ‘ त्या ‘ नराधम मुलास आजीवन कारावास……कुर्हाडीने घाव घालुन केले होते आईला ठार
Next articleवाघाची दहशत थांबता थांबेना, पुन्हा वाघाने केली गाईची व वासराची शिकार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here