Home Culture जिजामाता विद्यालयात समान संधी केंद्राचे थाटात उद्घाटन …

जिजामाता विद्यालयात समान संधी केंद्राचे थाटात उद्घाटन …

201
0

सावनेर/ खापा (Savner/Khapa) : जिजामाता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय खापा येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे अंतर्गत समतादूत प्रकल्प तालुका सावनेर व जिजामात हायस्कुल खापा यांच्या संयुक्त विद्यमाने समान संधी केंद्रांचा उद्घाटन सोहळा थाटात पार पडला.

यावेळी युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे उद्घाटन नागपुर जिल्हा प्रकल्प अधिकारी मा. हृदय गोडबोले यांनी केले. अध्यक्षस्थानी मा.प्राचार्य सुरेंद्र गभणे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणुन मा. वंदना वानखेडे समतादूत सावनेर या होत्या.
समान संधी केंद्रांतर्गत विद्यार्थ्यांना अपेक्षित विषयांवर व्याख्याने व कार्यशाळा आयोजित करता येऊ शकेल तसेच शिष्यवृत्ती, विविध योजना, जात वैधता प्रमाणपत्र, नौकरी, रोजगार विषयक माहिती समान संधी केंद्रात उपलब्ध होणार आहे. प्रत्येक महाविद्यालयात प्राचार्य, नोडल अधिकारी व विद्यार्थी प्रतिनिधी यांनी मिळून समान संधी केंद्र स्थापन करण्यात आले आहे असे नागपुर जिल्हा प्रकल्प अधिकारी मा. हृदय गोडबोले यांनी सांगितले. तर
युवकांच्या अनेक समस्या असतात परंतु समस्या कोठे मांडाव्यात आणि निराकरण कसे करावे असा मानसिक व बौद्धिक पेच युवकांपुढे असतो अशा अवस्थेत समुपदेशन करीता समान संधी केंद्र हे मौलिक विचार मंच ठरावे असा आशावाद सावनेर समतादूत वंदना वानखेडे यांनी व्यक्त केला.
बार्टीचे महासंचालक मा. सुनील वारे, विभागप्रमुख मा. सत्येंद्रनाथ चव्हाण व नागपूर जिल्हा प्रकल्प अधिकारी मा. हृदय गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली उपरोक्त कार्यक्रम पार पाडण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संदीप भोंडे यांनी केले. संचालक प्रा.देवेंद्र धुंदे तर आभार प्रा.पंकज बावणकर यांनी मानले.यावेळी महाविद्यालयातील शिक्षकवृंद तसेच शेकडो विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

बातमी संकलन: किशोर गणवीर

Previous articleपिण्याच्या पाण्यासाठी ३०० किमी पायी आलेल्या संघर्ष यात्रेला मिळणारं काय न्याय, उपमुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलनाला पोहोचण्या पूर्वीच संघर्ष यात्रेला केले रवाना
Next articleबिबट्याने घेतला वासराचा बळी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here