Home Breaking News अखेर ‘ त्या ‘ नराधम मुलास आजीवन कारावास……कुर्हाडीने घाव घालुन केले होते...

अखेर ‘ त्या ‘ नराधम मुलास आजीवन कारावास……कुर्हाडीने घाव घालुन केले होते आईला ठार

86
0

*रामटेक ( RAMTEK)- दारू पिण्यासाठी पैसे देत नसल्याच्या कारणावरून अंबाळा येथील रहिवाशी असणाऱ्या वृद्ध आईला पोटच्याच गोळ्याने कुर्हाडीने घाव घालुन ठार केल्याची घटना मागे घडली होती. दरम्यान फिर्यादीच्या तक्रारीवरून प्रकरण न्यायप्रविष्ट होते. त्याचा निकाल आज दि. २१ एप्रील ला लागला असुन नराधम मुलास आजीवन कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे.
कमलाबाई पतिराम ढोंगे रा. अंबाळा असे मृतक महिलेचे नाव असुन ती आरोपी मुलगा प्रमोद पतिराम ढोंगे वय ३० रा. अंबाळा याची आई होती. मृतक कमलाबाई व आरोपी मुलगा हे अंबाळा येथे एकाच घरात राहात होते. प्रमोद हा व्यसनाधिन होता. त्याला दारुचे व्यसन होते. तो मृतक आईला पैशाच्या व जेवणाच्या कारणावरून मारहाण करायचा. एक दिवस आरोपी प्रमोद ने आपल्या मृतक आईला दारू पिण्यासाठी पैसे का देत नाही या कारणावरून कुर्हाडीने मारून जिवानीशी ठार केले. दरम्यान अंबाळा येथीलच रहीवाशी सचिन लक्ष्मीकांत संगीतराय, वय २७ वर्ष, यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. रामटेक येथे अप. क्र. १२२ / २०१९ कलम ३०२, २०१ भादंवि कायद्यान्वये गुन्हा नोंद झालेला होता. सदर प्रकरणाचा आज २१ एप्रील ला निकाल लागलेला असुन नराधम मुलास आजीवन कारावास व ५०००/- रु. दंड व दंड न भरल्यास १ महिना साधी कैद अशी शिक्षा ठोठावली आहे. सदर प्रकरणाचे तपास पोलीस उपनिरीक्षक राजु मृत्युपोड पोस्टे रामटेक यांनी करून सदर प्रकरण न्याय प्रविष्ठाकरीता मा. कोर्टामध्ये सादर केले. आज दिनांक २१/०४/२०२३ रोजी मा. कोर्ट विद्यमान न्यायाधीश श्री. देशमुख यांनी हा निकाल दिलेला आहे. सरकारचे वतीने एपीपी नेवारे मॅडम यांनी काम पाहीले. कोर्ट कामात पैरवी अधिकारी म्हणुन पोशि/ २२२९ संदीप सहारे पोस्टे रामटेक यांनी मदत केली आहे.

Previous articleबिबट्याने घेतला वासराचा बळी
Next articleकोदेगांव -तिघई मार्गाचे हाल बेहाल, बांधकाम प्रशासन निद्रावस्थेत, त्वरीत दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here