Home Breaking News बिबट्याने घेतला वासराचा बळी

बिबट्याने घेतला वासराचा बळी

92
0

रामटेक (RAMTEK)-    वनपरीक्षेत्र कार्यालय रामटेक तथा ग्रामपंचायत खैरी बिजेवाडा अंतर्गत येणाऱ्या वहिटोला गावात गणेश चैतराम यादव यांच्याकडील तिन महिण्याच्या वासरावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना घडली आहे.

प्राप्त माहितीनुसार, गणेश यादव यांच्या घरच्या गोठ्यात ३ महिन्यांचे वासरू बांधलेले होते. दरम्यान पहाटे ३ वाजताच्या सुमारास बिबट्याने हल्ला करुन त्याला जवळच्या झाडावर ओढून खाऊन टाकले. शिवटेकडी, चारगाव परिसरात हा बिबट नागरीकांच्या निदर्शनात आला आहे.

या बिबट्याने परीसरातील डुक्कर, कुत्रे यांचेही भक्षण केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे डुक्कर आणि कुत्र्यांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे चित्र आहे. बिबटच्या या वाढत्या दहशतीने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे रामटेक येथील पथक घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करण्यात आला.पीडिताला नुकसान भरपाई तात्काळ मिळावी अशी मागणी पीडित कुटुंबीयांनी शाशनाकडे केली आहे.

बातमी संकलन:पंकज चौधरी

Previous articleजिजामाता विद्यालयात समान संधी केंद्राचे थाटात उद्घाटन …
Next articleअखेर ‘ त्या ‘ नराधम मुलास आजीवन कारावास……कुर्हाडीने घाव घालुन केले होते आईला ठार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here