Home Breaking News रामटेक येथे बालविवाह मुक्त गाव मोहिमेतर्गत रॅलीचे आयोजन

रामटेक येथे बालविवाह मुक्त गाव मोहिमेतर्गत रॅलीचे आयोजन

97
0

रामटेक (Ramtek) – एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प रामटेक अंतर्गत रामटेक तालुका बालविवाह मुक्त गाव मोहीम रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.  रॅली ची सुरुवात कार्यालयापासून पोलीस स्टेशन, तहसील, पंचायत समिती, आंबेडकर चौक होत गांधी चौकाकडे रवाना झाली, त्यानंतर आयसीडीएसच्या कार्यालयामध्ये रॅलीचे समापन झाले. रॅलीमध्ये सहभागी बालविकास प्रकल्प अधिकारी कुमारी माया पाटील पर्यवेक्षिका कुमारी नमिता रामटेके, अलका खंते, दीपा हुमणे, श्रीमती प्रेरणा ढोले, रंजना कांबळे त्याचप्रमाणे कार्यालयीन कर्मचारी, प्रकल्पातील सर्व सेविका महिला समुपदेशन केंद्र पोलीस स्टेशन रामटेकच्या समुपदेशिका दीपा चव्हाण रॅलीमध्ये सहभागी झाल्या, ही जनजागृती रॅली मध्ये बालविवाह म्हणजे अठरा वर्षाखालील मुलामुलींचे लग्न केले जाते, तसेच कमी वयाच्या मुलीचे लग्न पैशासाठी व घरची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नसल्याने किंवा घरी मुलींची संख्या जास्त असल्याने वयाने दुप्पट असणाऱ्या पुरुषासोबत विवाह करण्यासाठी मुलीवर दबाव टाकला जातो, तिचे शरीर शारीरिक दृष्ट्या परिपक्व नसल्यामुळे त्याचा सर्वात जास्त परिणाम तिच्या आरोग्यावर होतो व अशा वेळेस बाळंतपणाच्या वेळेस अनेक मुलींचा व जन्माला येणाऱ्या बाळाचा मृत्यू झालेला आहे.

बालविवाह हे एक सामाजिक दृष्ट्या महत्त्वाचा विषय आहे . याची प्रत्येकाने जाण ठेवायला पाहिजे.

Previous articleग्राम जयंती प्रचार यात्रेचे रामटेक येथे स्वागत
Next articleबाबासाहेब जयंतीदिनी विद्यार्थ्यास करियर विषयी मार्गदर्शन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here