Home Breaking News कृ. उ. बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप काँग्रेस प्रहार आणि गोंडवाना युती करून...

कृ. उ. बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप काँग्रेस प्रहार आणि गोंडवाना युती करून लढवणार निवडणूक

145
0

रामटेक (Ramtek) -आगामी होऊ घातलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती रामटेकच्या निवडणुकी करिता शेतकरी विकास सहकार पॅनल स्थानिक स्थरावर युती करून सर्व जागांवर उमेदवार लढविणार आहे. सदर निवडणुकीत चार गट एकत्र आलेले आहे. यात भारतीय जनता पार्टी च्या वतीने माजी आमदार श्री. मल्लिकार्जुन रेड्डी, श्री. गज्जू उर्फ उदयसिंग यादव(काँग्रेस गट),श्री. रमेश कारामोरे(प्रहार) आणि श्री. हरीश उईके(गोंडवाना गणतंत्र पार्टी) यांच्या संयुक्त प्रयत्नातून दिनांक 28 एप्रिल ला होणाऱ्या बाजार समितीच्या निवडणुकी करिता शेतकरी विकास सहकार पॅनल स्थापन करण्यात आले असून संपूर्ण 18 ही उमेदवारी जागांवर उमेदवार लढविणार असल्याचे माहिती यावेळी पत्रकार परिषदेत देण्यात आली. गेली अनेक वर्षापासून कृषी उत्पन्न बाजार समिती वर निवडणुकी दरम्यान एकाच पक्षाचे वर्चस्व राहत असल्याने सोबतच स्थानिक स्तरावर शेतकऱ्यांसाठी बाजार समिती कडून हक्काचे गोडाऊन ही मिळत नाही ज्यामुळे शेतकऱ्यांना पीक काढल्यानंतर शेतीतून पिकविलेला माल काहीच दिवस साठवून न ठेवता तसाच मिळत असलेल्या कमी किमतीत विकावा लागत असतो. यामुळे जर असेच घडत असेल आणि शेतकऱ्यांना यांना या सतत निवडून येणाऱ्या उमेदवार आणि बाजार समितीचा काहीच नफा होत नसल्याने शेतकरी दिवसेंदिवस हतबल होत चाललेला आहे. यामुळे स्थानिक स्तरावर स्थानिक नेत्यांनी एकत्रित येऊन शेतकरी विकास पॅनल या नावाने उमेदवार लढवीत असल्याची माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली.

यावेळी पत्रकार परिषदेला माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी कॉग्रेस नेते उदयसिंग उर्फ गज्जू यादव, प्रहारचे रमेश कारेमोरे, संजय मुलमुले, राजेश ठाकरे, राहुल किरपान,यांनी संबोधित केले. तर किशोर रहांगडाले,आलोक मानकर,नंदकिशोर कोहळे,जयेंद्र कांगाली,विनोद दूरुबुळे,सुभाष मानकर, आणि सर्व स्तरातील कार्यकर्ते पदाधिकारी आणि बाजार समितीचे अडतीया व्यापारी, हमाल, सरपंच सदस्य आणि नागरिक उपस्थित होते.

Previous articleनि:शुल्क वैद्यकीय तपासणीतून बाबासाहेबांना अभिवादन
Next articleग्राम जयंती प्रचार यात्रेचे रामटेक येथे स्वागत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here