Home Breaking News ग्राम जयंती प्रचार यात्रेचे रामटेक येथे स्वागत

ग्राम जयंती प्रचार यात्रेचे रामटेक येथे स्वागत

90
0

रामटेक (Ramtek) – जय गुरु ‘”वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज “यांचे ‘ग्राम जयंती प्रचार यात्रा ‘आज दिनांक 18/ 4 /2023 ला रामटेक येथे पोचली. या ग्राम जयंती प्रचार यात्रेचे स्वागत अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ रामटेक शाखा तसेच अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ नागपूर शाखेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात स्वागत आले. ग्राम जयंती प्रचार यात्रेविषयी आदरणीय श्री निळकंठ राव कळंबे गुरुजी नागपूर जिल्हा सेवाधिकारी यांनी प्रास्ताविकातून प्रचार यात्रेचा उद्देश विशद करण्यात आला.  आदरणीय श्री विठ्ठलराव सावरकर गुरुजी नागपूर विभागीय प्रचार सेवा अधिकारी यांनी ग्राम जयंतीची गरज या विषयावर मार्गदर्शन केले. आदरणीय पुंडलिक चौधरी नागपूर जिल्हा प्रचार प्रमुख यांनी गाव स्वच्छ ठेवण्याची गरज विशद केली. कार्यक्रमाला श्री बाबाराव पाटील साहेब अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ कार्यकारणी सदस्य नागपूर जिल्हा. सेवा अधिकारी यांनी महाराजांच्या विचारावर प्रकाश टाकला. श्री माकडे गुरुजी ग्रामगीताचार्य. यांनी व श्री श्रीधर पुंड सर यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता महत्त्वाची भूमिका बजावली. सुशील कुमार बुरडे केंद्रीय युवा संघटक अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम मोझरी. श्री वडीचर गुरुजी भंडारा जिल्हा सेवा अधिकारी. सुशील बर्गी सेवाधिकारी कोराडी . श्री चिंतामणजी मेश्राम सेवाधिकारी महादुला. श्री शेषरावजी सपकाळ प्रचारक .श्री घनश्यामजी चापले .श्री संजयजी चौधरी दहेगाव. हे प्रचार यात्रेसोबत आलेले प्रचारक. होते त्याचबरोबर माऊली भजन मंडळ रामटेक च्या सौ कांचन मिरासे. सौ वैशाली बोंद्रे .सौ छाया वंजारी .रेखाताई शेळके .मीनाक्षी बोंद्रे .लिलाबाई लोखंडे .निर्मलाताई लोखंडे .यांनी सादरीकरण केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. कांचनमाला मोरेश्वर माकडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री भयालालजी माकडे सचिव नागपूर जिल्हा गुरुदेव सेवा मंडळ, श्री राजूभाऊ देशमुख, श्री एकनाथ उईके, श्री मधुकर कुर्वे काकाजी, श्रीराम खोलकुटे,  महेश सुरसे,  पारस माकडे, मनोहर बावनकुळे, सोहम देशमुख, श्री दडोरे महाराज, जंजाळकर, श्नंदू नेरकर, पुंड सर . माकडे सर .सौ कांचन मला मोरेश्वर माकडे यांनी सहकार्य केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ कांचनमाला माकडे यांनी व आभार प्रदर्शन मोरेश्वर माकडे यांनी केले. कार्यक्रमाला राधेय भस्मे, पार्थ भस्मे, असंख्य गुरुदेव भक्त प्रचारक बालगोपाल उपस्थित होते कार्यक्रमानंतर सहभोजन झाले. गुरुदेवाच्या जयघोषाने कार्यक्रमाची सांगता झाली .व प्रचार यात्रा भंडारा जिल्हा करिता रवाना झाली. अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ रामटेक च्या वतीने पुढील प्रवासासाठी शुभेच्छा व सहयोग राशी देण्यात आली.

Previous articleकृ. उ. बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप काँग्रेस प्रहार आणि गोंडवाना युती करून लढवणार निवडणूक
Next articleरामटेक येथे बालविवाह मुक्त गाव मोहिमेतर्गत रॅलीचे आयोजन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here