Home विदर्भ बाबासाहेब जयंतीदिनी विद्यार्थ्यास करियर विषयी मार्गदर्शन

बाबासाहेब जयंतीदिनी विद्यार्थ्यास करियर विषयी मार्गदर्शन

86
0

रामटेक (RAMTEK) – डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त उड्डाण कॉम्प्युटर्स अँड स्किल अकॅडमी रामटेक येथे बौद्धिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात प्रमुख पाहुणे म्हणून श्रीयुत कपिल भोवते सर, अमोल गजभिये सर, मयूर गजभिये सर, अमित हटवार सर प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी 10 वी 12 वी नंतर काय ? , विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास?, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन इत्यादी विषयावर उत्कृष्ट मार्गदर्शन करण्यात आले.

विद्यार्थ्यांपैकी  कुमारी त्रिशा बोरकर, कुमारी स्नेहल मनगटे, कुमारी उर्वशी मडामे, कुमारी मुस्कान ठाकुर यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक जीवनावरील भाषणे केलीत कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रार्थना यादव मॅडम, चंदा उईके मॅडम, संघर्ष हटवार, रविंद्र सोमनाथे सर यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचे मुख्य संयोजक सतिश बोरकर यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

Previous articleरामटेक येथे बालविवाह मुक्त गाव मोहिमेतर्गत रॅलीचे आयोजन
Next articleपिण्याच्या पाण्यासाठी ३०० किमी पायी आलेल्या संघर्ष यात्रेला मिळणारं काय न्याय, उपमुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलनाला पोहोचण्या पूर्वीच संघर्ष यात्रेला केले रवाना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here