Home Breaking News खापा शहरातील ज्वलंत समस्याबाबत  नगरपालिकेवर धडकला मोर्चा…

खापा शहरातील ज्वलंत समस्याबाबत  नगरपालिकेवर धडकला मोर्चा…

137
0

सावनेर / खापा (Savner/ Khapa) –  खापा विकास आघाडी च्या वतीने येथील नागरिकांच्या ज्वलंत समस्या संदर्भात संतप्त नागरिकांचा खापा नगर परिषद कार्यालयावर मोर्चा धडकला.
नागरिकांच्या विविध समस्याबाबत मंगळवार ला सकाळी 11 : 00 वा. खापा येथील देना बँक बाजार चौकातुन मोर्चा काढण्यात आला. विद्युत बिलात नाना प्रकारचे विविध कर लावल्याने विद्युत बिलातमोठी वाढ झाल्याने सामान्य नागरिकांना बिल हे आवाक्याच्या बाहेर येत असल्याने विद्युत बिलात कटौती करण्यात यावी, याकरिता नागरिकांचा सर्व प्रथम विद्युत ऊपविभागाचे कार्यकारी अभियंता राजेश जयस्वाल यांना निवेदन सादर करण्यात आले.
विद्युत विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला निवेदन दिल्यानंतर मोर्चा सरळ नागरिकांच्या ज्वलंत समस्येबाबत घोषणाबाजी करत नगर परिषद कार्यालयावर धडकला. नगरपरिषद कार्यालयात मुख्याधिकारी उपस्थित नसल्याने तब्बल एक तास मोर्चेकऱ्यांना मुख्याधिकारी यांची तात्कळत वाट पहावी लागली.

शहरात एक ना अनेक समस्या असल्याने न.प. प्रभारी मुख्याधिकारी ऋचा धाबर्डे यांचे समोर खापा नगरवासीयांनी समस्यांचा फाडाच वाचायला सुरूवात केली. खापा नगरित काही दिवसापासून अनेक वस्त्यात गढुळ पाणी येत आहे. ऊन्हाळ्याचे दिवस असतांना पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. अनेक ठिकाणचे नाल्यांचे चेंबर गच्च भरले असल्याने अद्यापही चेंबर मधील गाळेचा उपसा केलेला नाही, त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. मुख्याधिकारी हजर राहत नसल्याने नागरिकांचे वेळेवर काम होत नाही. नागरिकांची गैरसोय होत असल्याने नगरपरिषदला स्थायी मुख्याधिकारी देण्यात यावा. पंतप्रधान आवास योजने अंतर्गत लाभार्थ्यांना थकीत असलेल्या निधी लवकरात लवकर मिळण्यात यावा. खापा शहरातील लोकसंख्येनुसार अंगणवाडी स्थापित करण्यात याव्यात. इत्यादी विवध  समस्यांनी हा मोर्चा गाजला. यावेळी खापा शहरातील विविध समस्यांचे निवेदन नगरपरिषद प्रभारी मुख्याधिकारी ऋचा धाबर्डे यांना देण्यात आले. याप्रसंगी खेमराज बारापाञे, हेमाराज आष्टणकर, भुपेन कोसे, पांडुरंग सुपारे, डोमा रेवतकर, राजु ढेंगरे, विकास बुरडे, हेमराज केकतपुरे, शंकर गोखे, नामदेव हरडे आदि शेकडो नागरिकांची उपस्थिती होती.
खापा शहरात होत असलेल्या गढुळ पाण्याच्या पुरवठा नागरिकांचा प्रमुख मुद्दा होता. शहरात गढुळ व दुषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिक व महिला संतप्त झालेल्या आहे. उपाययोजना करून गढुळ व दुषित पाण्याच्या पुरवठा त्वरित बंद करण्यात यावा. संतप्त महिलांनी मुख्याधिकारी यांना बजाऊन सांगितले.
अशा प्रकारच्या विविध समस्या मुख्याधिकारी यांचे समोर मांडल्या गेल्या. न.प.मुख्याधिकारी यांनी शांतपणे नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या. व त्यांचे समजूत काढली. लवकरात लवकर उपाय योजना करून समस्या मार्गी लावण्यात येईल असे यावेळी मुख्याधिकारी यांनी सांगितले.

“खापा नगरिच्या समस्येबाबत मी विशेष लक्ष देऊन उपाययोजना करून आपल्या समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार.”
ऋचा धाबर्डे,प्रभारी मुख्याधिकारी

 

बातमी संकलन :किशोर गनविर

Previous articleखुमारी टोल प्लाझा येथे डॉ.आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
Next articleतहानलेल्यांना मिळणार थंडगार पाणी….भारत विकास परिषदेचा स्तुत्य उपक्रम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here