Home Breaking News कन्हान येथे स्वाभिमानी भीम मोहोत्सव संपन्न 

कन्हान येथे स्वाभिमानी भीम मोहोत्सव संपन्न 

79
0

पारशिवनी कन्हान (Parseoni/Kanhan) :- विश्वरत्न ड़ॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त रिपब्लिकन सांस्कृतिक संघ कन्हानच्या वतीने दोन दिवसीय स्वाभिमानी भीम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून प्रबोधणकार भगवान गावंडे यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार (13 एप्रिल) रोजी करण्यात आले होते. विविध क्षेत्रात अतिविशेष कामगिरी करणाऱ्या मान्यवराचे सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी विश्वरत्न ड़ॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी कन्हान पोलीस निरिक्षक ( गुन्हे ) यशवंत कदम , रिपब्लिकन सांस्कृतिक संघ अध्यक्ष चंद्रशेखर भिमटे, कैलास बोरकर  प्रामुख्याने उपस्थित होते. प्रबोधनकार भगवान गावंडे यांनी प्रबोधनातून विचार मांडले तसेच सत्कार कार्यक्रमात रोटी बैंक व मनोरुग्नसाठी सतत कार्य करणारे हितेश बंसोड़, भटके विमुक्तांसाठी झटनारे व संघर्ष वाहिनी संस्थापक अध्यक्ष दिनानाथ वाघमारे , मांग गारोड़ी समाजाला मुख्य प्रवाहात आनण्यासाठी प्रयत्न करणारे नेवालाल पात्रे तसेच रुग्णसेवा खऱ्या अर्थाने सार्थक करणारे कन्हान प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी ड़ॉ.शशांक राठोड व ड़ॉ श्रीकृष्ण जामोदकर सोबत शिक्षण प्रवाह गतिवान करण्याच्या हेतुने कार्य करणारे धर्मराज प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक खिमेश बढिये , बळीराम दखने शाळेच्या मुख्याध्यापिका विशाखा ठमके यांचा सत्कार करण्यात आला असून छोटेखानी आयोजित पत्रकार सत्कार कार्यक्रमात एन. एस. मालवीय , कमल यादव , सतीश घारड, सुनील सरोदे , रविंद्र दुपारे , रमेश गोड़घाटे , धनंजय कापसिकर , विवेक पाटिल , रोहित मानवटकर , अश्वमेघ पाटिल , दीपचंद शेंडे यांचा मान्यवराच्या हस्ते सत्कार करण्यात आला. रात्री 12 वाजता भव्य केक कापून अतिशबाजी करण्यात आली. 14 एप्रिल रोजी नागपूर ग्रामीण पोलीस उपाधीक्षक (गृह ) संजय पुरंदरे यांच्या प्रमुख उपस्थितीत गीतकारा लता किरण यांच्या सुरु मधुर भीम गीतांचा कार्यक्रम पार पडला.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खिमेश बढिये तर आभार रोहित मानवटकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या सफलार्थ चेतन मेश्राम , नितिन मेश्राम , मनोज गोंडाने , धनंजय कापसिकर, अश्वमेघ पाटिल, नितेश टेभुर्णे, चंद्रमनी पाटील, शैलेश दिवे, प्रवीण सोणेकर, अखिलेश मेश्राम, पृथ्वीराज चौहान, रवींद्र दुपारे, अभिजित चंदूलकर आदिनी परिश्रम घेतले.

Previous articleएस.एफ.आय – डी.वाय.एफ.आय च्या वतीने फुले-आंबेडकर जयंती साजरी
Next articleमाजी विद्यार्थ्यांकडून शालेय साहित्य वितरण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here