Home Breaking News नि:शुल्क वैद्यकीय तपासणीतून बाबासाहेबांना अभिवादन

नि:शुल्क वैद्यकीय तपासणीतून बाबासाहेबांना अभिवादन

56
0

रामटेक (Ramtek) – विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२व्या जयंतीनिमित्त योगीराज स्वामी सितारामदास महाराज हॉस्पिटल, आकाशझेप फाउंडेशन द्वारा संचालित आम्ही भारतीय अभियान, धम्मज्योती बौध्द विहार समिती व नोवाईटीस आरोग्य परिवार यांचे संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर वॉर्ड रामटेक येथे नि:शुल्क वैद्यकीय तपासणी करून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. आम्ही भारतीय परिवार तर्फे बाबासाहेबांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून तपासणी शिबिराला सुरुवात झाली.

शिबिरात योगीराज हॉस्पिटलचे संचालक डॉ. विशाल कामदार, डॉ. प्रशांत मेश्राम, डॉ. कल्याणी तुपट, सुधीरकुमार राय, सिस्टर प्रणाली कडबे, अस्विनी, वैष्णवी कडबे, नोवाईटीस परिवार तर्फे सुनीता डोंगरे, दुर्गा मंदेलवार यांनी वैद्यकीय सेवा दिली. यावेळी ८८ व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली.

याप्रसंगी आम्ही भारतीय अभियानाचे मुख्य संयोजक साक्षोधन कडबे, ॲड. प्रफुल्ल अंबादे, पत्रकार नत्थू घरजाडे, अनिल वाघमारे, आकाशझेपच्या संचालिका अर्चना कडबे, संचालक वैभव तुरक, सदस्य अंकुश ठवरे, राहुल गजभिये, निखील धुर्वे, बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष विनोद राऊत, सदस्य अमित अंबादे, नितीन भैसारे, अश्विन सहारे, राजेश सांगोडे, उत्कर्ष अंबदे, वनिता धमगाये, उज्ज्वला धमगाये, चंद्रमणी धमगाये, विभोर राऊत, अरविंद सांगोडे, शुभम इंदुरकर हे प्रामुख्याने उपस्थित होते.

Previous articleभारतीय जनता पार्टी, मच्छिमार सेल आघाडी ची बैठक संपन्न
Next articleएस.एफ.आय – डी.वाय.एफ.आय च्या वतीने फुले-आंबेडकर जयंती साजरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here