Home Culture एस.एफ.आय – डी.वाय.एफ.आय च्या वतीने फुले-आंबेडकर जयंती साजरी

एस.एफ.आय – डी.वाय.एफ.आय च्या वतीने फुले-आंबेडकर जयंती साजरी

68
0

रामटेक (RAMTEK) – स्टूडेंट फेडरेशन ऑफ इंडिया (एस.एफ.आय) व डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डी.वाय.एफ.आय) च्या वतीने रामटेक येथील कार्यालयात फुले-आंबेडकर जयंती 15 एप्रिल रोजी सांयकाळी सहा वाजता साजरा करण्यात आला. कार्यक्रमात पत्रकार राहुल पेटकर  व ऍड. आनंद गजभिये प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान एस.एफ.आय चे अध्यक्ष संदेश रामटेके  यांनी भूषवले. लोकशाही म्हणजे देशाच्या संपत्तीचा वाटा सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचणे हा ही आहे, परंतु आज देशातील बहुतांश संपत्ती काही मूठभर लोकांचा हाथी संचित होत आहे अशी चिंता राहुल पेटकर यांनी व्यक्त केली. तसेच, आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांचा सामाजिक न्यायाचा लढा अधिक तीव्र करण्याची गरज आहे, असे ऍड. आनंद गजभिये म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम येलके यांनी केले तर आभार प्रदर्शन अमित हटवार यांनी केले. कार्यक्रमात सूरज डुंडे, संघर्ष हटवार, वैष्णवी टेकाम, अंतरा, उमेश तुंमडाम, आदित्य नेवारे, धनंजय सलामे, आशिष आदी उपस्थित होते.

Previous articleनि:शुल्क वैद्यकीय तपासणीतून बाबासाहेबांना अभिवादन
Next articleकन्हान येथे स्वाभिमानी भीम मोहोत्सव संपन्न 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here