Home Culture विद्यासागर कला महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व म. ज्योतिबा फुले यांची...

विद्यासागर कला महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व म. ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी

103
0

रामटेक (RAMTEK) –       विद्यासागर कला महाविद्यालय खैरी ( बिजेवाडा ) रामटेक येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तसेच क्रांतिसूर्य म. ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त  संयुक्तपणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ  बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयातील समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सुरेश सोमकुवर अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. ग्रामपंचायत खैरी बिजेवाडा येथील सरपंच सौ. उर्मिला खुडसाव प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. प्रमुख वक्ते म्हणून महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख डॉ. गिरीश सपाटे उपस्थित होते.

या प्रसंगी डॉ. गिरीश सपाटे यांनी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेऊन आजच्या भारताची भूमी ही या महापुरुषांच्या कार्याने आणि विचारांनी कशी सिंचित झालेली आहे, याचे अनेक दाखले देत सांगितले. सरपंच सौ. उर्मिला खुडसाव यांनी आपल्या विचारातून म. ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली. आपल्या अध्यक्षीय भाषणातून डॉ. सुरेश सोमकुवर यांनी आजच्या काळातही या महापुरुषांचे विचार आत्मसात करून आपल्या जीवनाला एक आकार देण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे विचार व्यक्त केले.

सांस्कृतिक कार्यक्रम विभाग प्रमुख डॉ. रवींद्र पानतावणे यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. सोनिया वानखेडे हिने सुत्रसंचालन केले.  क्रीडा विभाग प्रमुख प्रा. अनिल दाणी यांनी आभार मानले.

या प्रसंगी  डॉ. सावन धर्मापुरीवार, डॉ. ज्योती कवठे, डॉ. सतिष महल्ले , डॉ. आशीष ठाणेकर, डॉ. विलास जायभाये, कीर्ती जयस्वाल, जितेंद्र बडनाग, युनूस पठाण, संजय डोंगरे,ज्ञानेश्वर हटवार, रफिक कुरेशी, विनोद परतेकी, विद्यार्थीवृंद उपस्थित होते.

Previous articleरेतीच्या ६ ओव्हरलोड ट्रकवर महसुल विभागाची कारवाई
Next articleसम्यक बौद्ध विहार चारंगाव  येथे  बाबासाहेब जयंती  उत्साहात संपन्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here