Home Culture रामटेकच्या सुपुत्री मुंबई येथे राज्यमंत्र्यांचा हस्ते सन्मानित

रामटेकच्या सुपुत्री मुंबई येथे राज्यमंत्र्यांचा हस्ते सन्मानित

67
0

नागपुर (रामटेक)- नागपूर येथील सकाळ (टेंडरनामा) च्या वरिष्ठ पत्रकार एकता ठाकूर यांना विदर्भात पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करण्याबाबत सोबतच राजपूत समाजासाठी निरंतर सेवाभावी कार्य करण्याबद्दल मुंबई येथे सन्मानित करण्यात आले. एकता ठाकूर हया 10 वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. सोबतच त्या नेहमी समाजकार्य करीत असतात. आतापर्यंत त्यांनी राजपूत समाजाच्या आणि इतर गरजु लोकांची, विद्यार्थ्यांची मदत केली आहे आणि समोर ही असेच कार्य करण्याचा त्यांचा संकल्प आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत अखंड राजपूताना सेवासंघ च्या सत्कार कार्यक्रमात उत्तर प्रदेश चे राज्यमंत्री कुंवर ब्रिजेश सिंह यांनी श्रीरामचरितमानस देऊन त्यांना सन्मानित केले.
विशेष म्हणजे त्या नागपूर जिल्ह्याच्या रामटेक नगर परिषद चे सेवानिवृत्त स्वास्थ्य निरीक्षक ठाकूर इंदलसिंह बैस यांची मुलगी आहे. प्रभू श्रीरामचंद्रच्या कृपेने समोर ही असेच समाजकार्य करण्याचा एकता ठाकूर यांचा ध्येय आहे.
मुंबई च्या निर्मला कॉलेज ठाकुर कॉम्प्लेक्स कांदिवली, येथे दिनांक 9 एप्रिल ला अखंड राजपूताना सेवासंघ तर्फे आयोजित राजपूत सत्कार कार्यक्रमात संपूर्ण राज्यातील व्यवसाय, शिक्षा पत्रकारिता, खेळ, समाजसेवा या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला आणि पुरुषांचा मंत्री ब्रिजेश सिंह च्या हस्ते श्रीरामचरितमानस भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमात इनकमटैक्स आयुक्त भुनेश्वर (उड़ीसा) ठाकूर अजय कुमार सिंह, लखनऊ खंडपीठ चे उच्च न्यायालय चे मुख्य स्थाई अधिवक्ता एडवोकेट प्रशांत सिंह अटल, मुंबई पुलिस उपायुक्त प्रशांत सिंह परदेसी सोबत अनेक अतिथि उपस्थित होते.

Previous articleसम्यक बौद्ध विहार चारंगाव  येथे  बाबासाहेब जयंती  उत्साहात संपन्न
Next articleभारतीय जनता पार्टी, मच्छिमार सेल आघाडी ची बैठक संपन्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here