Home Breaking News वज्रमुठ सभेसाठी रामटेक येथे मवीआ ची आढावा बैठक संपन्न

वज्रमुठ सभेसाठी रामटेक येथे मवीआ ची आढावा बैठक संपन्न

98
0

रामटेक -शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी, वाढत्या महागाईसाठी व भाजप-शिंदे गट सत्ताधारी सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने 16 एप्रिल ला नागपूर येथे वज्रमुठ सभेचे आयोजन करण्यात आले आहे. याच हेतूने दि.11 एप्रिल रोजी रामटेक येथील माजी मंत्री राजेंद्र मुळक यांच्या जनसंपर्क कार्यालयात सावनेर विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा माजी मंत्री सुनीलबाबू केदार यांच्या मार्गदर्शनात बैठक पार पडली. प्रत्येक निष्ठावंत कार्यकर्त्यांनी 16 एप्रिल ला होणाऱ्या वज्रमुठ सभेला आवर्जून उपस्थित होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. या वज्रमुठ सभेत रामटेक तालुक्यातील ग्रामपंचायत स्तर व शहरातून प्रभागनिहाय नियोजन करण्यात आले असून, या सभेत ‘संपूर्ण रामटेक विधानसभा क्षेत्रातून 10 हजार च्या वर कार्यकर्ते सहभाग नोंदविणार असून वज्रमुठ सभा चांगलीच गाजनार आहे’, अशी माहिती रामटेक विधानसभा प्रमुख (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) श्री.विशाल बरबटे यांनी दिली.
यावेळी सावनेर विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा माजी मंत्री सुनीलबाबू केदार, माजी मंत्री तथा अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमीटी राजेंद्र मुळक, रश्मीताई बर्वे माजी जि.प. अध्यक्ष नागपूर , मुक्ता कोकोडे अध्यक्ष जि.प.नागपूर , कुंदाताई राऊत जि.प.उपाध्यक्ष नागपूर ,पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे, अवंतिका लेकुरवाडे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रामटेक विधानसभा प्रमुख विशाल बरबटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष नितीन वेरुळकर, दुधाराम सव्वालाखे, असलम शेख, कैलास राऊत, दामोदर धोपटे, राहुल कोठेकर यांच्यासहं महाविकास आघाडीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleवाईल्ड चॅलेंजरच्या पुढाकाराने शेवटी हाईमॉस्ट विद्युत खांबाचे उदघाटन
Next articleअवैध जनावरांच्या वाहतूक करणाऱ्या वाहनाचा अपघातात 5 जनावरांचा मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here