Home Crime अवैध जनावरांच्या वाहतूक करणाऱ्या वाहनाचा अपघातात 5 जनावरांचा मृत्यू

अवैध जनावरांच्या वाहतूक करणाऱ्या वाहनाचा अपघातात 5 जनावरांचा मृत्यू

121
0
रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या दिशादर्शक फलकाला आदळलेले वाहन.
रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या दिशादर्शक फलकाला आदळलेले वाहन.

रामटेक (Ramtek) –   नागपूर – जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील चोरबाहुली शिवारात चालकाला झोपेची लटक आल्याने वाहन अनियंत्रित होऊन महामार्गाच्या कडेला लावण्यात आलेल्या दिशादर्शक फलकाला जोरदार धडक देऊन रस्त्यावर पलटी झाल्याची घटना दि.13 एप्रिल रोजी सकाळी 6.30 वाजताच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे या वाहनात जनावरांची अवैध वाहतूक होत असल्याचे दिसून आले.

प्राप्त माहितीनुसार,जबलपूर कडून नागपूरकडे MH 06 AH 4168 क्रमांकाची कार जनावरांना अवैधपणे डांबून नागपूरकडे जात होती. चोरबाहुली शिवारात येताच वाहन चालकाला झोपेची लटक आल्याने त्यांच्या ताब्यातील वाहन रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या दिशादर्शक फलकाला आदळले. यात तो लोखंडी फलक पूर्णतः उखडून गाडीच्या आत शिरले. व पुढे जाऊन महामार्गाच्या मधोमध वाहन पलटी झाले. अपघात होताच वाहन चालक वाहन सोडून पसार झाले. स्थानिकांच्या मदतीने अपघात झालेल्या वाहनातून जनावरांना बाहेर काढण्यात आले.

या वाहनात एकूण 9 जनावरे (गोरे) ठेवण्यात आले असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी यांनी दिली. या 9 पैकी 5 जनावरे घटना स्थळावर गतप्राण झालेत तर,  4 जनावरे जखमी असून त्यांना पुढील उपचारासाठी गो-विज्ञान अनुसंधान केंद्र देवलापार येथे घेऊन गेल्याची माहिती आहे.

घटनेची माहिती खुमारी टोल प्लाझा यांना मिळताच रुग्णवाहिका टीम घटना स्थळी पाठविण्यात आली. यावेळी  डॉ.गजभिये, मनोज ठाकरे, पेट्रोलिंग टीम पांडू वाघाडे, बंडू नखाते,देवलापार पोलीस स्टेशन येथील PSI लक्ष्मी घोडके, वाडके मेजर,चालक लक्ष्मण गायकवाड, सूर्यप्रकाश वावरे यांनी घटनास्थळ गाठून मार्ग मोकळा करून वाहतूक सुरळीत केली. घटनेचा अधिक तपास देवलापार पोलीस करीत आहे.

Previous articleवज्रमुठ सभेसाठी रामटेक येथे मवीआ ची आढावा बैठक संपन्न
Next articleरेतीच्या ६ ओव्हरलोड ट्रकवर महसुल विभागाची कारवाई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here