Home Culture किट्स अभियांत्रिकी महाविद्यालय येथे 3 दिवसीय टेक्नोडीअनचे समापन

किट्स अभियांत्रिकी महाविद्यालय येथे 3 दिवसीय टेक्नोडीअनचे समापन

175
0

रामटेक – कविकुलगुरु इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलाजी अँड सायंस (किट्स) रामटेक
मध्ये विद्यार्थ्याच्या वतीने राष्ट्रिय स्तरावरील तांत्रिक व सांस्कृतीक युवा महोत्सव
टेकनोडियन 23 चे 3 दिवसीय आयोजन 11 ते 13 एप्रिलला केले आहे. 11 एप्रिलला सकाळी 11 वाजता महोत्सवाचे उद्घाटन कॉनट्रेप्शनची रीबीन कापून व द्विप प्रज्वलन करून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठचे प्रकुलगुरु डॉ. संजय दुधे यांचे हस्ते झाले.कार्यक्रमाची अध्यक्षता वोडीथला शिक्षण संस्थाचे सचिव व्ही. श्रीनिवासराव यानी केली.या वेळी प्रामुख्याने विदर्भ प्लॉस्टिक इंडस्ट्रिज असोशिएशनचे उपाध्यक्ष डॉ. प्रशांत अग्रवाल, प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे, विद्यार्थी डीन डॉ. पंकज आष्टणकर, संयोजक प्रा.प्रज्ञाशिल रामटेके, विद्यार्थी प्रतिनिधी कुनाल कडव व मोहक पाचपोर, डीन, विभाग प्रमुख, प्राध्यापक सहित मोठ्या संखेत विद्यार्थीि उपस्थित होते.

प्रकुलगुरु डॉ. संजय दुधे म्हणाले कि उत्साह, संयम, धैर्य, विश्वास असेल तर समृद्धी येते. विद्यार्थ्यानी कल्पकतेवर विश्वास ठेवून निरंतर प्रयत्न केले तर यश नक्किच येते. त्यांनी केंद्रीय मंत्री श्री नितिनजी गडकरीचे उदाहरण देतांना म्हणाले की गडकरी 1995 च्या पूर्वी रोड व डेव्हलपमेंटचे स्वप्न बघत होते. आता त्यांनी प्रत्यक्षात उतरवले व देशात रोड क्रांति केली.

डॉ. प्रशांत अग्रवाल म्हणाले कि अभ्यास व्यतीरीक्त विद्यार्थ्यांनी विविध तांत्रिक उपक्रमामध्ये सहभागी व्हावे. कंपन्यांना जुगाडु व्यक्तिची जरूरत आहे.
संस्था सचिव व्ही. श्रीनिवासराव म्हणाले की विविध उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना निधिची कमी पडू देणार नाही.

प्राचार्य म्हणाले की युवकाच्या शक्तिवर राष्ट्रांची प्रगती अवलंबून आहे. युवा महोत्सव मधून विद्यार्थी अनेक कला शिकतील.विद्यार्थी डीन डॉ. पंकज आष्टणकर यांनी राष्ट्रीय स्तरीय विविध प्रकल्प विषयी माहिती दिली.

तीन दिवसीय युवा महोत्सव मधे यूथ पार्लिमेंट, पीच परफेक्ट, कोड क्रच, कोडेथान, नुज्य ट्रबल, कॅपटीव्हीटे, क्रेन -ओ-मोनिआ, छायाचित्र, बोट मॉरेथान , महारहस्य, सहित 22 टेक्नीकल व नाँन टेक्नीकल स्पर्धा आयोजित केल्या । यात विविध इंजीनियरिंग कॉलेजचे व किट्सच्या 1500 विद्यार्थ्यांनी भाग घेतला.13 एप्रिलला समारोपीय कार्यक्रमात एमएसएमई नागपूरचे सहाय्यक संचालक मधुकर भुरले प्रामुख्याने हजर होते . ह्या वेळी विविध स्पर्धा मध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांचे हस्ते प्रस्ततीपत्रक, पदक व रोख पुरस्कार देण्यात आले . कार्यक्रमाच्या समापना नंतर आपल्या कलेचा अविष्कार करताना विद्यार्थ्यांनी सायंकाळी मनमोहक असे नृत्य व गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक संयोजक प्रा. प्रज्ञाशिल रामटेके यानी केले. संचालन अमित रामटेके व रक्षक मेश्राम व आभार मोहक पाचपोर यानी केले.

Next articleएक वही,एक पेन’ उपक्रमातून बाबासाहेबांना मानवंदना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here