Home Culture एक वही,एक पेन’ उपक्रमातून बाबासाहेबांना मानवंदना

एक वही,एक पेन’ उपक्रमातून बाबासाहेबांना मानवंदना

198
0

पारशिवनी/टेकाडी : नवसंकल्प सामाजिक,सांस्कृतिक,बहुउद्देशीय संस्था आणि नवयुवक सिद्धार्थ बहुउद्देशीय संस्था टेकाडी यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त एक वही,एक पेन या सामाजिक उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद टेकाडी शाळेतील विद्यार्थ्यांसोबत शालेय पाठयपुस्तक वितरण करून बाबासाहेबांना मानवंदना देत विचारांची जयंती साजरी करण्यात आली.

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजनाला माणुसकीच जीवन दिलंच,परंतु त्याच बरोबर शिक्षणाची कास धरून आपली प्रगती साधण्याचा मूलमंत्र देखील दिला आहे,याच पाश्वभूमीवर
ग्राम पंचायत सदस्य सतीश घारड यांनी नवसंकल्प सामाजिक, सांस्कृतिक,बहुउद्देशीय संस्थेची सुरवात बाबासाहेबांच्या जयंती निमित्त केली,नवयुवक सिद्धार्थ बहुउद्देशीय संस्था आणि नवसंकल्प संस्थेच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळेतील १७ विदयार्थ्यांना शालेय पाठयपुस्तके डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक टेकाडी येथे वितरीत करण्यात आली सोबत गावातील सरपंच विनोद इनवाते,जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका सुनंदा भगत यांना बाबासाहेबांच्या सही असलेलं मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला,प्रसंगी सरपंच विनोद इनवाते,रमेश भोवते,चंद्रमनी भेलावे,उपसरपंच जितेंद्र चव्हाण, सुनंदा भगत,अशोक राऊत,भुमेशवर भेलावे,अरुण बागडे,अश्विन गजभिये,मारोती हूड,रामाजी नाईक,भीमराव गजभिये,ग्राम पंचायत सदस्य सतीश घारड,कुणाल वासाडे,सचिन कांबळे,तारकेश्वरी मोरे,शीतल सातपैशे,अर्चना वासाडे,गीता कश्यप,मीना झोड,पायल झोड,पूनम भोवते,रोहित देशभ्रतार, कुंदन शेंडे,बाळू नाईक,चंदन वाघमारे,रवी सावरकर,राजकुमार वझेकर,स्वदेश भोवते,प्रणय पौणिकर,सुमित भोवते,जनार्धन सातपैशे,कांतेश सातपैशे,विलास सावरकर,मनोज मोहाडे सह ग्रामस्थ उपस्थित होते.संचालन सतीश घारड,आभार पूनम भोवते यांनी मानले.

 

Previous articleकिट्स अभियांत्रिकी महाविद्यालय येथे 3 दिवसीय टेक्नोडीअनचे समापन
Next articleवाईल्ड चॅलेंजरच्या पुढाकाराने शेवटी हाईमॉस्ट विद्युत खांबाचे उदघाटन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here